Monday, September 17, 2012

Bappa aala :)

आहे तसा तो कलेचा गुरु!! पण असतो सतत माझ्या बाजू, जरी मी त्याच्यावर एरवी लक्ष नाही दिले, अडचणीत त्याने मला नेहेमी सावरले!! कारण आहे त्याची मी लाडकी. कधी कधी मीच त्याला विसरते, पण दुखाच्या वेळी मी बघते माझी बाजू, आणि हा असतो चिल मारत माझ्या बाजू, विचारतो "आज तुला मोदक हवा की काजू" घेतो माझी काळजी वेळो वेळी पण आज आहे माझी पाळी. लाडात येऊन बोलले त्याला, " जाणार नाही दुकानात ,मीच कोरणार तुला प्रेमाने आणि तुझ्याच दिलेल्या कलेने" देणार सुट्टी तुला पाच दिवसाची समोर ठेवीन, बाजूला नाही. आहे रोज तुला मोदक आणि जलेबी, सांगीन सगळ्यांना घ्याला अशी काळजी तुझी, होऊन जाशील छान गुटगुटीत!! आहे तुला पाच दिवसाची सुट्टी, परत ये माझ्या बाजूशी, आणि सोडव माझ्या अडचणी , कारण आहे मी तुझी लाडकी !! :)

No comments:

Post a Comment